डहाणू ची महालक्ष्मी देशातल्या एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. महालक्ष्मीची यात्रा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कृष्णपक्षातील अष्टमीपर्यंत मंदिराच्या सभोवती असलेल्या विशाल मैदानात भरते. मंदिराच्या जवळून महामार्ग जात असल्यामुळे वस्ती वाढली आहे. सुरत, मुंबई मधील लाखो लोक येथे येतात. येथे येण्यासारखी खास बसेस सुटतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर ध्वजस्तंभ असून त्यावर मोठा ध्वज सदैव फडकत असतो. दसर्याला जुना ध्वज काढून त्या जागी नवीन ध्वज लावला जातो. यात्रेच्या वेळी ध्वजस्तंभाची पूजा करतात. नंतर देवीची पूजा करतात. मंदिराच्या समोर सभामंडप, दोन दीपमाळा असून त्यांच्या मध्ये मुख्य होमकुंड आहे. त्याच्या दोन्ही बाजूंला दोन होमकुंडे आहेत.
डहाणूपासून पुढे थेट गुजरात राज्याच्या सीमेवर जेवढा आदिवासी समाज आहे त्या समाजाच्या चालीरीती आणि सांस्कृतिक जीवन या महालक्ष्मीच्या श्रद्धेनेच व्यापलेले आहे. या परिसरात शेत, माळरान व परसात जे पिकते ते या देवीला वाहिल्याशिवाय भक्षण केले जात नाही. 'पितृबारस', 'वाघबारस' आणि 'माहिबारस' हे आदिवासींचे लोकजीवन आणि कलाजीवन जपणारे विधिवत सोहळेच आहेत. निसर्गावर जगणारे, निसर्गाला जपणारे व निसर्ग पूजणारे आदिवासी त्या दिवशी भक्तिभावाने मंदिरात न चुकता जमतात.