Warli Painting Center by AYUSH
-
Warli Painting Center by AYUSH
Near Bust Stop, on Vangoan Kasa Road, Near Birsa Munda House, Khambale,
Taluka Dahanu, Dist Palghar, Maharashtra 401103
*Ne...
Showing posts with label bhatakanti. Show all posts

सप्तश्रृंगी देवीः अर्धे शक्तीस्थळ
सप्तश्रृंगी देवीः अर्धे शक्तीस्थळ
सप्तश्रृंगी देवी मंदीर
महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून पासष्ट किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.
आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन् होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात एकशे आठ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे. देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप रम्य आहे.
सप्तश्रृंगी देवी मंदीर
सप्तश्रृंगी देवी डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती. शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, वरुणाचा शंख, अग्नीचे दाहकत्व, वायूचा धनुष्यबाण, इंद्राचे वज्र व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्षप्रजापतीची स्फटिकमाला, ब्रह्मदेवाचे कमंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरूपी देवीची तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्वकर्माचा तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे.
मूर्ती काहीशी झुकलेली आहे. त्याबाबतची कथाही गमतीदार आहे. गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्चर्या करीत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
सुमारे 472 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होते. चैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतात. चैत्रात देवीचे रूप हसरे, तर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जाते. चैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचा, तर नवरात्रोत्सव सासरच्यांचा, असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जाते. नवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतात. देवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतो. देवीला रोज वेगळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात येते. तिला अकरा वार साडी लागते. चोळीसाठी तीन खण लागतात. नऊ दिवस विविध रूपांत पूजा-अर्चा केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते. त्यानंतर नेवैद्य दाखविला जातो. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहे. हा मान दिंडोरी तालुक्यातील दरेगावच्या पाटील कुटुंबीयांस आहे; मात्र ते हा ध्वज कसा लावतात हे कोणालाही समजत नाही.
गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे. याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेत. पूर्वी 108 कुंडे होती; मात्र आता त्यांतील बरीच बुजली आहेत. याशिवाय तांबुलतीर्थ, काजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेत. तांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते. गडाची व्यवस्था पाहण्यासाठी ग्रामपंचायत आहे. याशिवाय देवीचे विश्वस्त मंडळही आहे. त्यांच्यातर्फे येथे बऱ्याच सुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था गडावरच आहे. याशिवाय जेवणाच्या रूपातील प्रसादही भाविकांना दिला जातो. भाविकांच्या गर्दीमुळे गडावरच आता सर्व सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अगदी हॉटेलसह सर्व वस्तूंची दुकाने येथे आहेत.
गडावर जाणे आता सर्वांना सहजशक्य झाले आहे. नाशिकसह जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या आगारांनी नवरात्रोत्सवाची गर्दी लक्षात घेऊन थेट गडापर्यंत जादा बस सुरू केल्या आहेत. या काळात खासगी गाड्यांना गडाखालीच उभे करावे लागते. त्यापुढे फक्त एसटी बस जाऊ शकतात. त्यामुळे थेट गडापर्यंत जाता येते. याशिवाय, गड चढून जाण्यासाठी नांदुरीतून पायऱ्यांचा रस्ता आहे.
कसे जाल?
हवाई मार्ग- सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी जवळचे विमानतळ मुंबई किंवा पुणे आहे. तेथून नाशिकला यावे लागेल.रेल्वे मार्ग- सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक आहे.रस्ता मार्ग- सप्तश्रृंगी गड नाशिकपासून ६५ किलोमीटरवर आहे. नाशिकहून सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तसेच खासगी गाड्याही उपलब्ध आहेत
original at - http://meemarathi.blog.co.in/2009/06/16/%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%a4%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%83%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%83-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%87/

महालक्ष्मीच्या पुजेचे बुकींग होणार ऑनलाईन

कोल्हापूर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीरची महालक्ष्मी देवी आणि दख्खनचा राजा ज्योतीबा या देवालयांच्या व परिसराच्या सुधारणेसाठी मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात असून तो लवकरच सर्व आमदार, खासदार जिल्हाधिकारी यांच्यापुढे सादर केला जाणार आहे. यात विविध सुधारणा सुचविण्यात आल्या असून परगावच्या भाविकांना पुजेसाठी ऑनलाईन बुकींग करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय सुरक्षितता म्हणून मंदिरात सीसी टिव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत.
समितीचे नूतन सचिव भरत सुर्यवंशी यांनी १ जूनला पदभार स्वीकारला. देवस्थान समितीतला अंदाधुद कारभार थांबवून उत्पन्न वाढ, मंदिराचे पावित्र्य, सुधारणा स्वच्छता याची माहिती आज त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मंदिरात या सुधारणा करणार१. परगावच्या भाविकांसाठी सोयीसाठी महालक्ष्मीच्या पूजेसाठी ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.२. मंदिराचे पावित्र्य लक्षात घेऊन स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार आहे.३. मंदिरात चपलाना बंदी घातली जाईल.४. ऐतिहासिक वास्तू असलेल्या दगडी बांधकामाला जपण्याचे प्रयत्न करण्यात येतील.५. मंदिरात प्रकाश व्यवस्था व नगारखान्यातील वाजत्र्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था६. ध्वनीक्षेपण यंत्रणा, सीसी टिव्ही कॅमेरा बसवले जाणार आहेत.७. ज्योतिबावरही प्रभावळ दुरुस्ती, वातानुकुलित यंत्रणा यासारख्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
निधी असा जमा करणारया मंदिराच्या सुधारणेसाठी विशेष प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. उदागिरी येथे समितीची तीन हजार एकर जागा असून शासन त्यावरील रॉयल्टी म्हणून मिळालेले १५ लाख रुपये देवस्थान समितीला देणार आहे. दुबई येथील एका भाविकाने २१० कोटी रुपये मंदिराच्या सुधारणेसाठी देण्याची तयारी दर्शवली आहे. ग्वाल्हेरच्या ज्योतिरादित्य देवस्थान ट्रस्टकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या सर्व पैशातून महालक्ष्मी मंदिर व जोतिबा देवस्थान विकासाबाबत मास्टर प्लॅन तयार करण्याची योजना असून त्यासाठी लोकप्रतिनिधी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
original at - http://meemarathi.blog.co.in/2009/06/17/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a5%81/

रानात, फुलात; कोकणच्या गावात!
रिफ्रेश व्हायचंय?
|
विक्रमगडचा निसर्ग खुणावतो!
|
माहुलीचा इतिहास जागवताना
|
शांततेचा निवारा
|
ओढाळ नाणेघाटाचा ट्रेक
|
भोराईच्या किल्ल्यावर
|
रिफ्रेशिंग अर्नाळा
| |||||||
|
निसर्गराजा, ऐक सांगतो!
पावसाळा सुरू झाला की निसर्गवेड्यांना वेध लागतात ते वीकएण्ड पिकनिक्सचे. प्रत्येकातच एक निसर्गवेडा लपलेला असतो. शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यात आपली नेहमीची कामं सोडून वारंवार निसर्गाशी गळाभेट घेता येत नाही. पण पावसाळ्यात मात्र निसर्गाला उराउरी भेटण्यावाचून पर्यायच उरत नाही. लोणावळ्यासारख्या टिपिकल पावसाळी ठिकाणी जाणारे फॅमिली टुरिस्ट असोत किंवा डोंगराच्या कडेकपाऱ्यांमध्ये निसर्गाच्या हिरव्या दुलईवरून मुक्तपणे फिरणारे भटके असोत, पावसाळा आला की स्वत:च्याही नकळत झपाटल्याप्रमाणे निसर्गाच्या कुशीत शिरायला आपण आतूर होतो. हल्ली त्याच त्याच ठिकाणी जाण्यापेक्षा नवी ठिकाणं शोधण्याकडे कल जास्त आहे. लोणावळ्यासारख्या ठिकाणी भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पाण्यापेक्षा माणसंच अधिक असतात. काही वर्षांपूवीर् याचा उबग येऊन अशाच काही भटक्यांनी अॅम्बी व्हॅलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराच्या कुशीत दडलेला एक अप्रतिम धबधबा शोधून काढला. आता मात्र भुशी डॅम इतकीच या धबधब्यावरही गदीर् उसळलेली असते. शिवाय, दारूड्या पर्यटकांचा त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळेच लोणावळा, माळशेज घाट यांसारखी दृष्ट लावणारी ठिकाणं फॅमिली टुरिस्टना नकोशी झाली आहेत. शिवाय, ट्रेकर मंडळींनाही या ठिकाणांचं फार आकर्षण राहिलेलं नाही. लोणावळ्याच्या तुलनेत खंडाळा मात्र अजूनही पर्यटकांच्या गदीर्पासून काहीसा लांब आहे. पर्यटकांपेक्षा ट्रेकर्सचा ओढा खंडाळ्याकडे जास्त आहे, तो इथले हिरवेगार डोंगर आणि इथल्या प्रख्यात ड्युक्स नोजमुळं. रेल्वे ट्रॅक सोडून हिरवीकंच वस्त्र ल्यालेल्या डोंगराच्या कुशीत शिरलं की, बाहेरच्या जगाची कणमात्र आठवण राहात नाही. आपल्या खांद्यापर्यंत उतरलेले ढग, सतत रिपरिपणारा पाऊस, थंडगार हवा, जिकडे पाहावं तिकडे हिरवाईचं साम्राज्य... निसर्ग असा मोकाट सुटलेला असतो की त्याचं हे मुक्त बागडणं बघून आपल्याही मनात हर्ष दाटून येतो. शहरात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटणारे आपण तिकडे मात्र निसर्गाचा हात पकडून तो नेईल तिथे त्याच्याबरोबर जातो. खंडाळ्यापर्यंत जायची इच्छा नसेल तर त्याच्या अलीकडेही काही चांगली ठिकाणं आहेत, जी अजून तरी पर्यटकांच्या गदीर्पासून लांब आहेत. नेरळला उतरायचं ते माथेरानला जाण्यासाठीच. माथेरानचा पाऊस ही खास अनुभवण्यासारखी चीज आहेच; पण माथेरानपर्यंत पोहोचायच्या आधी स्टेशनपासून १५ मिनिटांवरच भान हरवायला अनुभव देणारं ठिकाण आहे ते म्हणजे टपालवाडी. स्टेशनला उतरून रस्त्यानं माथेरानच्या दिशेने पायी निघालं की, १० मिनिटांत उजव्या हाताला एक तलाव लागतो. या तलावावरून पुढे चालत गेलं की सामोरा येतो तो टपालवाडीचा धबधबा. हा सर्व परिसरच तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. शुद्ध हवा, नजर पोहोचेल तिथवर हिरवं साम्राज्य, आकाशातून सुरू असलेला पावसाचा अभिषेक आणि शुभ्र दुधासारखा वाहणारा धबधबा आणि हे सर्व ठाण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावर. असंच एक ठिकाण कर्जतला आहे. त्याचं नाव आहे कोंडाणा केव्ज. राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या या बौद्धकालीन गुंफा अतिशय देखण्या आहेत. कर्जत स्टेशनला उतरून एसटी किंवा सहा आसनी रिक्षाने कोंदिवडे गावाला उतरलं की तिथून पायी चालत तासाभरात या गुंफापाशी पोहोचता येतं. इथूनच पुढे राजमाचीला जायचा रस्ता आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या आणि पहिल्या शतकातल्या या गुंफा काळाचे घाव सोसत अजूनही उभ्या आहेत. एक चैत्यस्तूप आणि सात विहार यांचा समावेश असलेल्या या गुंफातील कोरीवकाम दृष्ट लागण्यासारखं आहे. ज्यांना डोंगरदऱ्यांत भटकण्याची हौस नसेल त्यांच्यासाठी मुंबई-ठाण्याच्या आसपास अनेक समुदकिनारे आहेत. अलिबागच्या समुदकिनाऱ्यावरही माणसांची गदीर् उसळलेली असते. पण अलिबागला लागूनच असलेले आक्षी, नागाव आणि रेवदंड्याच्या किनाऱ्यांवर मात्र तुलनेने कमी गदीर् असते. वरून कोसळणारा पाऊस आणि समोर उधाणलेला समुद हे दृष्य मन मोहून टाकणारं आणि चित्तवृत्ती भारणारं आहे. रेवदंड्याच्याच पुढे कोरलईचा किल्लाही पाहण्यासारखा आहे. या किल्ल्यावरून अलिबागपर्यंतचा समुदकिनारा दृष्टीपथात येतो. इथेच दीपस्तंभही आहे. मात्र, या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यामुळे जेमतेम मोटारसायकली इथे जाऊ शकतात. ठाणे जिल्ह्यात डहाणू, बोडीर्चा समुद वीकएण्ड पर्यटनासाठी आदर्श आहे. डहाणू हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील विभाग म्हणून घोषित करण्यात आला असल्यामुळे इथे एखाद दोन अपवाद वगळता मोठे उद्योग नाहीत. त्यामुळे इथला निसर्गरम्य परिसर अद्यापि टिकून आहे. पालघर, सफाळे, डहाणू, बोडीर् हा सारा परिसर म्हणजे निसर्गाची खाण आहे. या शिवाय, ठाणे जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणून ख्यातकीर्त असलेलं जव्हार हेही वीकएण्ड पिकनिकसाठी आदर्श ठिकाण आहे. | ||||||||||||||||
Tribal toursim!
Virtual Tour - Dahanu's Mahalaxmi
Find us on Facebook
Map to Mahalaxmi
Dahanu Road Station [Western Rail way Mumbai suburban last station]> Charoti > Mahalaxmi
1. All MSRTC Buses routed to Mahalaxmi yatra
2. Regular 6 seater from Dahanu to Mahalaxmi
3. 6 seater from Dahanu to charoti & charoti to mahalaxmi autorikshaw
4. Individual vehicles [mahalaxmi is on NH 8, 125km from Mumbai towards Ahemadabad