महालक्ष्मीच्या पुजेचे बुकींग होणार ऑनलाईन
कोल्हापूर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीरची महालक्ष्मी देवी आणि दख्खनचा राजा ज्योतीबा या देवालयांच्या व परिसराच्या सुधारणेसाठी मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात असून तो लवकरच सर्व आमदार, खासदार जिल्हाधिकारी यांच्यापुढे सादर केला जाणार आहे. यात विविध सुधारणा सुचविण्यात आल्या असून परगावच्या भाविकांना पुजेसाठी ऑनलाईन बुकींग करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय सुरक्षितता म्हणून मंदिरात सीसी टिव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत.
समितीचे नूतन सचिव भरत सुर्यवंशी यांनी १ जूनला पदभार स्वीकारला. देवस्थान समितीतला अंदाधुद कारभार थांबवून उत्पन्न वाढ, मंदिराचे पावित्र्य, सुधारणा स्वच्छता याची माहिती आज त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मंदिरात या सुधारणा करणार१. परगावच्या भाविकांसाठी सोयीसाठी महालक्ष्मीच्या पूजेसाठी ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.२. मंदिराचे पावित्र्य लक्षात घेऊन स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार आहे.३. मंदिरात चपलाना बंदी घातली जाईल.४. ऐतिहासिक वास्तू असलेल्या दगडी बांधकामाला जपण्याचे प्रयत्न करण्यात येतील.५. मंदिरात प्रकाश व्यवस्था व नगारखान्यातील वाजत्र्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था६. ध्वनीक्षेपण यंत्रणा, सीसी टिव्ही कॅमेरा बसवले जाणार आहेत.७. ज्योतिबावरही प्रभावळ दुरुस्ती, वातानुकुलित यंत्रणा यासारख्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
निधी असा जमा करणारया मंदिराच्या सुधारणेसाठी विशेष प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. उदागिरी येथे समितीची तीन हजार एकर जागा असून शासन त्यावरील रॉयल्टी म्हणून मिळालेले १५ लाख रुपये देवस्थान समितीला देणार आहे. दुबई येथील एका भाविकाने २१० कोटी रुपये मंदिराच्या सुधारणेसाठी देण्याची तयारी दर्शवली आहे. ग्वाल्हेरच्या ज्योतिरादित्य देवस्थान ट्रस्टकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या सर्व पैशातून महालक्ष्मी मंदिर व जोतिबा देवस्थान विकासाबाबत मास्टर प्लॅन तयार करण्याची योजना असून त्यासाठी लोकप्रतिनिधी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
original at - http://meemarathi.blog.co.in/2009/06/17/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a5%81/
Warli Painting Center by AYUSH
-
Warli Painting Center by AYUSH
Near Bust Stop, on Vangoan Kasa Road, Near Birsa Munda House, Khambale,
Taluka Dahanu, Dist Palghar, Maharashtra 401103
*Ne...